टीम मंगळवेढा टाईम्स।
सोशल मीडियावर इंस्टाग्रामवरील ‘सेलिब्रिटीज’ ला फॉलो केला तर तुम्हाला पैसे मिळतील असे सांगून चार अनोळखी व्यक्तींनी वारंवार फोन करून ४ लाख ३८ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, रवी दत्तात्रय श्रीराम (वय-३१, रा. वेंकटेश नगर, सोलापूर) यांना मोबाईल व्हॉट्सअपवर सुत्रा एच. आर. प्रायव्हेट लिमिटेड
या नावाच्या कंपनीचा असा मेसेज आला की, ‘सेलिब्रिटीज’ ला फॉलो केला तर सुरुवातीला २० रुपये मिळतील. दर दिवशी २५ टास्क पूर्ण केले तर ३५० रुपये मिळतील.
त्यानुसार रवी श्रीराम यांनी होकार दर्शवित चॅटिंग सुरू केली. ग्रुप जॉईन केल्यानंतर रवी श्रीराम यांच्या बँक खात्यावर २१० रुपये जमा झाले.
त्यानंतर दुसऱ्या व्यक्तींनी फोन करून त्याच्या खात्यावर ३५ हजार रुपये भरले. त्या मोबदल्यात काही पैसा मिळाला नाही. याची विचारणा केली असता ६५ हजार रुपये भरण्यासंदर्भात मेसेज आला.
ही रक्कम सुध्दा परत न मिळाली नाही. दरम्यान, पुन्हा १ लाख ३८ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार रवी श्रीराम यांनी पुन्हा एकदा १ लाख २९ हजार रुपये भरले.
८ मार्च रोजी टेलिग्रामवरून चौथ्या व्यक्तीने मेसेज करून १ लाख ९५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीने माझे भरलेले पैसे कधी मिळणार? अशी विचारणा केली.
तेव्हा, तुमचे क्रेडिट स्कोअर कमी आहे. म्हणून तुम्हाला परत ५८ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर
रवी श्रीराम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज