टीम मंगळवेढा टाईम्स।
पाटखळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ऋतुराज बिले यांचा अवघ्या 35 मतांनी विजय मिळाला आहे. नवखे उमेदवार आनंद ताड यांनी मोठी टक्कर दिली त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सुरवातीला बिनविरोध होणारी निवडणूक तिरंगी लागली, सरपंचपदासाठी तब्बल जण रिंगणात उतरले होते.
गेल्या काही दिवसापासून पाटखळकरांना पाण्या वाचून वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे नवीन सरपंच पाणीपुरवठा सुरळीत चालू करतील नागरिकांना आशा लागून राहिल्या आहेत.
आनंद ताड यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी तीन पॅनल स्थापन होऊन ही निवडणूक लागली.
या निवडणुकीत ऋतुराज बिले यांना स्व.हर्षराज बिले यांची पुण्याई देखील कामी आली आहे, ऋतुराज बिले यांच्यासह पॅनलचे 7 सदस्य निवडून आले आहेत. पाठखळकरांना नवीन सरपंचाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचे नागरीक बोलत आहेत.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते इथून पुढच्या काळात गावाच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे आनंद ताड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज