टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यात आंदोलन करण्यात येत असून
जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. तर, आज बुधवार दि.13 सप्टेंबर रोजी मंगळवेढा शहर आणि तालुक्यात सर्व शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँक, खाजगी संस्था, एस टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनात आज बऱ्याच शाळा, महाविद्यालय बंद ठेऊन सामील होणार असल्याचे संबंधित शाळा प्रशासनाने जाहीर केले आहे.
काल मंगळवारी सकाळी 11 वाजता दामाजी चौकात रास्ता रोको व साखळी आंदोलन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
उद्या गुरुवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा दामाजी चौक पासून सुरुवात होऊन शिवजयंती मिरवणूक मार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी अर्धनग्न व मुंडण आंदोलन दामाजी चौकात सकाळी 10 वाजता होणार आहे.
शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात रक्तरंजीत सह्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात चक्काजाम व अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
आज होणाऱ्या सर्व शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँक, खाजगी संस्था, एस टी बंद आवाहनाला सर्वानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे.
तर काही ठिकाणी आंदोलनालात हिंसक घटना सुद्धा समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज