मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटरचनेचा प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केला. यंदा झेडपीच्या गट संख्येत वाढ झालेली नाही.

प्रसिद्ध प्रारूप आराखड्यावर सोमवार, २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी हरकती सादर करावेत. त्यानंतर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रारूप आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गटरचना प्रसिद्ध केली आहे. या ६८ जिल्हा परिषद गटात १३६ पंचायत समिती गणांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर गटरचना निश्चित करणे गरजेचे असून, नागरिकांच्या हरकती आणि सूचना आल्यानंतर त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम गटरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम गटरचनेच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवले जाणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंतिम गटरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय गटांची नावे
मंगळवेढा : संत दामाजी नगर, हुलजंती, लक्ष्मी दहीवडी, भोसे
सांगोला : महूद बु., एकतपूर, जवळा, कडलास, चोपडी, कोळा, घेरडी

पंढरपूर : करकंब, भोसे, रोपळे, गोपाळपूर, वाखरी, भाळवणी, टाकळी, कासेगाव
करमाळा : पांडे, कोर्टी, केम, वीट, चिखलठाण, वांगी
माढा : भोसरे, मानेगाव, उपळाई बुद्रुक, कुई, टेंभुर्णी, बेंबळे, लॉळ
बार्शी: उपळाई ठोंगे, पांगरी, उपळे उमाळा, शेळेगाव आर, पानगाव, मालवंडी

मोहोळ : आष्टी, नरखेड, कामती, पोखरापूर, पेन्नूर, कुरूल
उत्तर सोलापूर : नान्नज, दारफळ बीबी, कोंडी

माळशिरस : दहीगाव, मांडवे, कोंडशिरस, संग्रामनगर, माळीनगर, बोरगाव, वेळापूर, निमगाव, पिलीव
दक्षिण सोलापूर : बोरामणी, कुंभारी, वळसंग, हत्तूर, मंद्रुप, भंडारकवठे

अक्कलकोट: चपळगाव, वागदरी, जेऊर, मंगळूर (पान), नगरसूर, सालगढ

मंगळवेढा तालुका
दामाजी नगर जिल्हा परिषद गट
1. दामाजी नगर गण : दामाजी नगर,धर्मगाव,उचेठाण,बठाण,मुढवी,माचनूर,ब्रम्हपुरी,तामदर्डी,ढवळस
2. बोराळे गण : बोराळे,सिद्धापूर,अरळी, तांडोर,रहाटेवाडी, मुंढेवाडी,डोणज,नंदूर
हुलजंती जिल्हा परिषद गट
3. मरवडे गण : मरवडे, डिकसळ, कर्जाळ,तळसंगी,भालेवाडी,बालाजी नगर, भाळवणी,खोमनाळ,फटेवाडी, हिवरगाव, हाजापुर,जालीहाळ,सिध्दनकेरी, खडकी
4. हुलजंती गण : हुलजंती, येड्राव,माळेवाडी,कागष्ट,कात्राळ,खवे,जित्ती,पौट,बावची,सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खुर्द,कागष्ट,कात्राळ-कर्जाळ
3.भोसे जिल्हा परिषद गट
5. रड्डे पंचायत समिती गण :-रड्डे,
निंबोणी,चिक्कलगी, मारोळी,शिरनांदगी,
सलगर बुद्रुक, लवंगी,
6.भोसे पंचायत समिती गण:-
भोसे,नंदेश्वर,हुन्नूर, रेवेवाडी, लोणार,पडोळकरवाडी,महमदाबाद हु.मानेवाडी,
4 लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट
7. चोखोमेळा नगर पंचायत समिती गण
डोंगरगाव, चोखामेळा नगर,
पाटकळ, शिरशी,गोणेवाडी,
लेंडवे- चिंचाळे,कचरेवाडी,खुपसंगी
8.लक्ष्मीदहिवडी पंचायत समिती गण :- आंधळगाव लक्ष्मी दहिवडी,ममदाबाद शे,गुंजेगाव,मारापुर,देगाव,शरदनगर,गणेशवाडी, शेलेवाडी, घरनिकी,अकोला,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










