मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. पण त्याआधीच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

तर तिसऱ्या टप्प्यान महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली. हे सर्वजण आता दोन आठवड्यात बदलीच्या ठिकाणी हजर होतील, अने कार्यभार सांभाळतील. त्यानंतर दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात येईल.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो, अशी माहिती सकाळला राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येतेय. पाच डिसेंबरच्या आसपास राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात.

त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर सात दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. ३१ डिसेंबरच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

महापालिका निवडणुका कधी लागणार ?
राज्यात तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीच्या आधी महापालिका निवडणुका होतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर अखेरीस आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकाचवेळी होणार असल्याचे समजतेय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















