टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाल संपल्याने मंगळवेढा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची नेमणूक झाली आहे.
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा शेतकरी संघटक युवराज घुले यांनी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना भेटून निवेदन दिले.
त्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा नगरपरिषद प्रशासन आल्यापासून अगोदर मंजूर झालेले कामे पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
मुख्याधिकारी व काळजीवाहू प्रशासनामध्ये नसल्यामुळे सर्व विकास कामे बंद आहेत ओबीसी राजकीय आरक्षणामुळे निवडणूक आणखी किती कालावधी पुढे जाईल हे समन्वय अनिश्चित आहे.
यामुळे बरेच दिवस प्रशासकाच्या हातामध्ये नगरपालिकेचे सूत्रे राहणार आहेत मंगळवेढा शहराच्या विकासाचे मंजूर असलेली कामे या संदर्भामध्ये प्रशासकाची काम का ठप्प आहेत याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती.
अद्याप पर्यंत त्यांनी या बद्दल कोणत्याही ठेकेदाराला विचारणा केली नाही काळजीवाहू प्रशासक म्हणजे मंगळवेढा नगरीचा प्रथम नागरिक आहे त्यांची जबाबदारी आहे.
त्यांनी मुख्याधिकारी यांना या गोष्टीचा जाब विचारायला हवा होता मंगळवेढ्याची सर्वसामान्य जनता नगरपरिषदेला कर देते नागरिकांना रस्ता स्वच्छता पाणी या सुविधा देणे नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे.
पाण्याच्या बाबतीमध्ये तीन दिवसांतून एकदा पाणी येत आहे अनेक शौचालयाची कामे सुद्धा पेंडिंग आहेत रस्त्याची कामे सुद्धा प्रलंबित आहेत नागरिकांना या सुविधा मिळत नसतील तर कर कशासाठी भरून घेतला.
जातो त्याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे प्रशासकाची गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे सर्व कामे प्रलंबित आहेत तरी जिल्हाधिकारी यांनी पारदर्शकपणे धडाकेबाज कर्तव्यदक्ष प्रशासक मंगळवेढा नगरपरिषदेला द्यावा अशी मागणी केली आहे.
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे अर्जुन मुल विजय साठे दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
मंगळवेढा प्रांत अधिकारी यांच्यावर सांगोला व मंगळवेढातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या मोबदला देण्यासंदर्भामध्ये फार मोठा व्याप त्यांच्यावर आहे त्या व्यापातून ते प्रशासक म्हणून मंगळवेढा नगरपरिषदेला वेळ देऊ शकणार नाहीत म्हणून त्यांना प्रशासकाच्या व्यापातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज