मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । समाधान फुगारे
दुष्काळी मंगळवेढा तालुक्यासह राज्यात शैक्षणिक,सांस्कृतिक वारसा कायम ठेवण्यामध्ये माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
घरामध्ये राजकीय वारसा नसताना देखील नसतानादेखील बुद्धी क्षमतेच्या जोरावर त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली.
परंतु पंढरपूरच्या शेजारी असलेल्या दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला दुष्काळ दशा कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठे कष्ट घेतले या भागाला पाणी मिळावे म्हणून उजनी कालवा खोमनाळ परिसरामध्ये शेवट झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरापर्यंत हुलजंती,कागष्ठ पर्यत गेला.
या परिसरामध्ये बागायत क्षेत्र वाढ होण्यास मदत झाली.1999 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत शरद पवार यांच्या साक्षीने म्हैसाळचे पाणी आणण्याचे सुतोवाच केले आज तब्बल 21 वर्षांनंतर मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याचा मार्ग सुलभ झाला.
उजनी लाभ क्षेत्रात वाढ आणि म्हैसाळचा आजचा पाणी प्रश्न तालुक्यामध्ये मार्गी लावण्यात सुरुवातीच्या काळात सरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी युती शासनाच्या काळात तालुक्याला पाणी मिळावे व कृष्ण तलाव भरून द्यावा या मागणीसाठी चोखामेळा चौकात उपोषणाचा मार्ग स्वीकारला परंतु काही मंगळवेढेकरांनी प्रती उपोषण करून त्या सरांच्या आंदोलनाची टर उडविण्याचा प्रयत्न केला.
पण तेव्हाच्या सराच्याच प्रयत्नाचे पाणी आज मंगळवेढ्याला मिळत आहे, बाकी अजूनही काही भागात पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे तालुक्यातील शैक्षणिक विकासात देखील सरांनी फार मोठे कष्ट घेतले.
भाळवणी, येड्राव, खवे पडोळकरवाडी शिरनांदगी पाटकळ डोणज मंगळवेढा नंदूर सोड्डी या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व महाविद्यालय सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकू लागल्या त्यामुळे त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन बंद पडणारे शिक्षण केवळ सरांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील मुली शिकू लागल्या.
हा प्रयत्न केवळ मंगळवेढा पुरता मर्यादित राहिला नाही तर राज्यभर यामध्ये शैक्षणिक क्रांतीत योगदान दिले शाहू शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानाबरोबर वैचारिक ज्ञान मिळावे म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्ये वासंतिक वर्ग सुरू करून त्यामध्ये शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षा व त्यांना भौतिक सामाजिक राजकीय ज्ञानाची माहिती हवी म्हणून नामांकित वक्ते आणून त्यांना त्याबाबतचे ज्ञान उपलब्ध करून दिले
मंगळवेढा मध्ये कवी संमेलन व धार्मिक कार्यक्रमात बाबा महाराज सातारकर यांचा कार्यक्रम घेऊन तालुक्याचे संत परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही कॅम्पस मुलाखती संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या
नगरपालिकेमध्ये विविध विकास कामांसाठी मंत्रीपदी पदावर असताना निधी उपलब्ध करून दिला व पालकमंत्री झाल्यावर देखील मंगळवेढेकर यांना झुकते माप दिले तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय व विकासात मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन देखील त्यांना राजकारणामध्ये मोठा संघर्ष करावा लागला.
त्या राजकीय संघर्षाचे बळी ठरले त्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र त्यांनी आपला ठसा मात्र सोडला नाही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम करणारे तेच खरे ठरले आहेत त्यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर बहुजनांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले
आज त्यांच्या पश्चात ही जबाबदारी अॅड कोमल ढोबळे साळुंखे यांच्या खांद्यावर आहे त्या देखील ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. कोमलताई आपल्या कर्तुत्वाने राज्यभर दौरे काढून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत तर पुत्र अभिजीत ढोबळे हे देखील सूतगिरणीच्या माध्यमातून सरांचा वारसा जोपासण्याचे काम करीत आहेत.
परंतु, या सर्वांच्या अशा या देदीप्यमान राजकीय वाटचालीचा वाटचालीत वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या पत्नी सावली फाऊंडेशन चे आधारस्तंभ अनुराधा ढोबळे या आजमितीला नसणे ही मोठी खंत असली तरी सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना..- विशाल खंदारे सोलापूर.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज