mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 10, 2026
in क्राईम, राज्य

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून 50 लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे.

या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमा अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा पिच्चरटाईप बनाव उघडकीस आला अन् सरकारी अधिकाऱ्यांची बोगसगिरी उघडी पडली.

खासगी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता.

दावा करताना 19 एप्रिल 2025 रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव जखमी होऊन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना, पोलिसांनप्राथमिक अहवालसह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती.

मात्र विमा कंपनीने या विमा प्रकरणाची चौकशी केल्यानंतर,त्यात अनेक विसंगती आढळल्या. तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 23 फेब्रुवारी 2024 रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले.

चौकशीदरम्यान त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची तारीख 23 फेब्रुवारी 2024 अशी नमूद असल्याचे आढळले. तसेच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले.

याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते असल्याचे तसेच त्यांच्या नावावर इतर सुमारे 10 विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले. यावरून अपघात व मृत्यूची संपूर्ण बनावट प्रकरण तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले.

9 आरोपींना अटक

दरम्यान, या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक-मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर

तसेच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बनावट पद्धतीने विमा रक्कम मिळवून देणारी टोळी उघडकीस आली असून या प्रकरणात साधारणतः विविध विमा कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील समोर आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: क्राईम

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 10, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 10, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 9, 2026

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 10, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा