मंगळवेढा टाईम्स न्युज।
सोलापूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्यपदांसाठीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी आजपासून (७ एप्रिल) अधिकृतपणे सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३५ ग्रामपंचायतींमधील ४७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
निवडणुकीचे मुख्य आकर्षण: सरपंचपदासाठी थेट निवडणूक या पोटनिवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त असलेल्या १३ सरपंचपदांसाठी थेट जनतेतून निवड केली जाणार आहे.

याशिवाय ३४ सदस्यपदांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडेल. जात प्रमाणपत्र अवैध ठरणे, मृत्यू, राजीनामा किंवा अविश्वास ठराव यांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.
या गावांमध्ये वाजणार निवडणुकीचे बिगुल!
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे.

यात प्रामुख्याने महत्त्वाची गावे: फटेवाडी, अनकढाळ, चिकमहूद, खवासपूर, पानिव, मंद्रुप, कोळेगाव, लोंढे, मोहितेवाडी, हंजगी, सुलतानपूर, कोन्हाळी, सलगर, देवगाव, ईश्वर वठार, वांगी, कुसूर, जिंती, कात्रज, यावली, आणि शंकरनगर यांसह ३५ गावांचा समावेश आहे.

राजकीय हालचालींना वेग
आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांची पळवापळवी आणि मोर्चेबांधणीला आता वेग येईल. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने अनेक गावांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचा निवडणूक कार्यक्रम:
उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी मिळणार आहे.

दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी या ग्रामपंचायतीची पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये 2022 साली निवडणूक झाली होती. त्यानंतर सरपंचसह सर्व सदस्यांनी अडीच वर्षांनी राजीनामा दिला होता.
असा आहे निवडणूक कार्यक्रम..
७ ते १३ एप्रिल उमेदवारी अर्ज स्वीकारणे (शनिवार व रविवारी सुट्टी वगळून)
उमेदवारी अर्जाची छाननी : बुधवार, १५ एप्रिल (सकाळी ११ वाजेपासून)
निवडणूक चिन्ह वाटप, तसेच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध : शुक्रवार, १७ एप्रिल (दुपारी ३ नंतर)
मतदान दिनांक : मंगळवार, २८ एप्रिल (सकाळी साडेसात ते सायं. साडेपाचपर्यंत)
मतमोजणी: बुधवार, २९ एप्रिल
निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे : बुधवार, ६ मे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










