टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे तिघे सोलापुरात दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. आज मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता होम मैदानावर
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमाला तिघांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी बारा वाजता सोलापूर विमानतळावर तिघांचेही आगमन होणार आहे. यावेळी रे नगरच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तिघे एकत्र आले होते.
कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून ३५ ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मागील दोन दिवसांपासून होम मैदानावर ठाण मांडून आहेत.
सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनासंदर्भात सूचना दिल्या. महिला लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे, त्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आरोग्य पथक,
वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आदी अत्यंत काटेकोरपणे सर्व संबंधित यंत्रणा काम करत आहेत. एकंदरीत प्रशासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज आहे
हरिभाई देवकरण प्रशालेत पार्किंग व्यवस्था
महिलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसेस पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून किमान दहा हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्हीआयपीसाठी नॉर्थकोट मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर कार्यकर्त्यांच्या चार चाकी वाहनासाठी हरिभाई देवकरण प्रशाला, स्काऊट गाईड मैदान व संगमेश्वर कॉलेज येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याप्रमाणे दुचाकीसाठी श्री सिद्धेश्वर मंदिर पार्किंग व हुतात्मा मंदिर पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज