टीम मंगळवेढा टाईम्स ।
मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आरक्षित झाले असून सर्वसाधारण महिला 6, सर्वसाधारण 7, ओबीसी महिला 3, ओबीसी 2, अनुसूचित जाती महिला 1 व अनुसूचित जाती 1 असे एकूण 20 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
याप्रसंगी प्रांताधिकारी बी.आर माळी, मुख्याधिकारी सुजित जाधव, कार्यालयीन अधिक्षक सचिन मिसाळ, लेखापाल अश्विन भोई यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.
खालील प्रमाणे नगरसेवक पदासाठी सोडत झाली
प्रभाग 1 ; अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ( महिला) ब) सर्वसाधारण
प्रभाग 2 ; अ) सर्वसाधारण ( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 3 ; अ) अनुसूचित जाती (महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 4 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 5 : अ) सर्वसाधारण (महिला), ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग 6 : अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 7 : अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 8 : अ) सर्वसाधारण ( महिला), ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग 9 : अ) सर्वसाधारण ( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 10 ; अ) सर्वसाधारण ( महिला), ब) अनुसूचित जाती
याप्रसंगी माजी नगरसेवक अजित जगताप, भाजप माजी शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, राहुल सावंजी, भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे, काँग्रेस शहराध्यक्ष राहुल घुले, शिवसेनेचे प्रतीक किल्लेदार, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, प्रकाश खंदारे, मुजमिल काझी, माऊली कोंडूभैरी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या सोडतीकडे लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांचा महिला आरक्षण पडल्यामुळे हिरमोड झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज