टीम मंगळवेढा टाईम्स।
पहाटे पाच वाजता एका ६ वर्षीय मुलाला झोपेत मण्यार जातीचा साप चावला. सापाने दंश केल्यानंतर अवघ्या एक तासात त्या मुलाचा मृत्यू झाला.
ही घटना बोरगाव (दे) (ता. अक्कलकोट) येथे घडली असून महादेव स्वामीनाथ हत्तरके असे मृत मुलाचे नाव आहे.
दरम्यान, या मुलाला साप चावल्यानंतर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले,
पण उपचारांपूर्वी त्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महादेव हा बोरगाव (दे.) येथे राहतो.
शुक्रवारी रात्री घरात सर्वजण गाढ झोपले असताना महादेवला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. पहाटे ५ वाजता त्याला त्याला त्रास होऊ लागला.
मुलाला साप सावल्याचे लक्षात आल्यानंतर आईवडिलांनी महादेवाला त्वरित अक्कलकोट येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र याठिकाणी उपचारापूर्वीच महादेवचा दुर्दैवी अंत झाला. या चिमुकल्या मुलाच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज