मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अजित जगताप यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
मंगळवेढा शहराची हद्दवाढ करून संत दामाजीनगर, संत चोखामेळानगर व कान्होपात्रा नगर मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, शहराची हद्दवाढ झाल्यानंतर संपूर्ण हद्दवाढ भाग व मंगळवेढा शहराची भुयारी गटार योजना करणार.
खेळांडुसाठी अद्ययावत क्रीडा संकुल
मंगळवेढा शहरातील विद्यार्थी-तरूणांकरिता सर्व खेळांसाठी अद्ययावत क्रीडा संकुल बांधणार, शहरामध्ये अद्ययावत बगीचा तयार करणार

चोविस तास शुध्द पाणी पुरवठा
शहरास व हद्दवाढ भागास चोविस तास शुध्द पाणी पुरवठा करणार
महापुरूषांचे पूर्णाकृती पुतळे उभारणार
महात्मा बसवेश्वर महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, नरवीर शिवा काशीद, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, राजमाता जिजाऊ माँसाहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या महापुरूषांचे मंगळवेढा शहरात पूर्णाकृती पुतळे उभारणार.

बसवसृष्टी व संतशृष्टी उभारणार
महात्मा बसवेश्वर यांचे कृष्ण तलाव लगत उचित स्मारक उभारून बसवसृष्टी निर्माण करणार, संत चोखामेळा यांच्या नावाने संतशृष्टी उभारणार
धार्मिक स्थळांसाठी स्थानिक समिती
मंगळवेढा नगरपरिषद किंवा शासकीय जागेवर असलेल्या धार्मिक स्थळांना स्थानिक समिती गठीत करून मंगळवेढा नगरपरिषद कडून देखभाल दुरुस्ती करणार

ग्राम दैवत हजरत गैबीपीर दर्गा व परिसर लतिफ बाबा दर्गा व परिसर अल्पसंख्याक बहुल विकास योजना अंतर्गत विकसित करणार
जमीन प्लॉट डायरेक्ट बिगरशेती
मंगळवेढा शहर व हद्दवाढ भागातील रहिवासी झोन मधील सर्व मिळकती महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ कलम ४२ व व ड अन्वये डायरेक्ट बिगरशेती करून जमीनींचे मुल्यांकन वाढवणार.
युवकांसाठी व युवतींसाठी स्वतंत्र अत्याधुनिक व्यायाम शाळा
आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर केलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा निर्माण करणार, युवकांसाठी व युवतींसाठी स्वतंत्र अत्याधुनिक व्यायाम शाळा बांधणार

ब्लड बँक उभारणार
मंगळवेढा शहरात ब्लड बँक उभारणार, स्वच्छ व सुंदर मंगळवेढा करिता अत्याधुनिक स्वच्छता यंत्रे उपलब्ध करणार
भूमीगत गटारी
मंगळवेढा शहर व परिसरात भूमीगत गटारी अद्यावत करणार, मंगळवेढा शहरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण प्रणाली विकसित करणार
आरक्षित शासकीय भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल उभारणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत दलित वस्ती सुधारणार, निराधार व निर्वासित लोकांसाठी विकास आराखडा नुसार आरक्षित शासकीय भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल उभारणार.

मटण मार्केट विकसित करणार
मंगळवेढा शहरातील कुंभार तलाव लगत विकास आराखडा नुसार आरक्षित जागेवर व्यापक स्वरूपात मटण मार्केट विकसित करणार
गरजुंना घरकुल उभारण्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुदान
मंगळवेढा शहरातील गरजुंना घरकुल उभारण्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करणार असल्याचे सुजाता अजित जगताप यांनी जाहीरनाम्यातून सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










