टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतीय जनता पार्टीच्या ध्येय-धोरणांचा प्रचार करण्यासाठी आणि महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवेढा तालुका महिला मोर्चाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षा आशा आण्णासाहेब पाटील यांनी या निवडींची अधिकृत घोषणा केली.
तळागाळापर्यंत पोहचणार भाजपचे कार्य
यावेळी बोलताना आशा पाटील म्हणाल्या की, “पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी ही नवी फळी सज्ज झाली आहे.
नूतन पदाधिकारी: कोणाकडे कोणती जबाबदारी?
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही महिला कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे.
अश्विनी संतोषकुमार कुलकर्णी (उपाध्यक्षा), माधुरी सुरेखा सावंजी (कार्याध्यक्ष), शारदा रामचंद्र बनसोडे (तालुका उपाध्यक्ष), पुनम हरिचंद्र सवईसर्ज (सरचिटणीस), कल्पना अभिजीत भोसकर (सरचिटणीस),
स्वाती विठ्ठल फुगारे (चिटणीस), लता महादेव दिघे (तालुका सचिव), कोमल सुरज अवघडे (उपाध्यक्षा), राजाबाई सुभाष घाडगे (चिटणीस) आणि पुनम संतोष भोसले (सह कार्याध्यक्षा) नाही यांचा समावेश आहे.
महाप्रशिक्षण शिबिराचा उत्साह
कार्यकारणी घोषणेसोबतच शहरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान’ अंतर्गत मंडलस्तरीय शिबिर संपन्न झाले. यामध्ये कार्यकर्त्यांना पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दिग्गजांची उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण, जेष्ठ नेते शंकरराव वाघमारे, सरचिटणीस संतोष मोगले, विकास वाघमारे, अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे, उपाध्यक्ष खंडू खंदारे, मंडल अध्यक्ष नागेश डोंगरे, पं.स. सदस्य मळसिद्ध मुंगळे,
युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, उपाध्यक्ष अनुप देवधर, युवा मोर्चा अध्यक्ष सत्यजित सुरवसे तसेच सुशांत हजारे, अजित लेंडवे, कपिल हजारे, विश्वास चव्हाण, संजय माळी, रमेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाची ताकद वाढणार
या नव्या कार्यकारिणीमुळे मंगळवेढा तालुक्यात भाजप महिला मोर्चाला ‘नवचैतन्य’ मिळाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.-आशा पाटील, भाजप.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












