मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी ऋचा हिने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवले.
एवढेच नाही तर ती राज्यात पहिली आली आहे.2023 मध्ये ही परीक्षा झाली होती त्यानंतर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
ऋचा हिचे वडील पिग्मी एजंट तर आई अंगणवाडी शिक्षिका आहे. दोघांनी अतिशय कष्टातून मुलीला शिक्षण दिले. तिने या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाचे अभिनंदन केले जात आहे.
अतिशय कठीण परिस्थितीत मुलीचे शिक्षण पूर्ण केले आणि मुलीने अशा पद्धतीने यश मिळाल्याने विठ्ठल कुलकर्णी यांना अश्रू अनावर झालेत.
खूप आनंद होतोय : ऋचा कुलकर्णी
या परीक्षेत मिळवलेल्या यशानंतर ऋचा कुलकर्णी हिनं खूप आनंद होतोय, असं म्हटलं. वडील पिग्मी एजंट असून आई अंगणवाडी शिक्षिका होती, तिनं 2019 मध्ये ती सोडली होती.
आई वडिलांची खूप मेहनत आहे यामध्ये, माझी मेहनत म्हणजेच अभ्यास 10 टक्के असून आई वडिलांचं श्रम आणि गुरुजनांचं आशीर्वाद 90 टक्के आहे,
असं ऋचा कुलकर्णी म्हणाले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणं वडील पिग्मी एजंट आहेत, त्यांना 100 रुपयांना 2 रुपये कमिशन मिळतं, त्यातून 15 हजार रुपयांचा खर्च भागवणं अवघड होतं. वडील दोन ड्रेसवर राहिले पण आमच्या गरजा पुरवत राहिले, आईची पण तशीच मेहनत आहे, असं ऋचा कुलकर्णी यांनी सांगितलं.
आई वडिलांच्या श्रमामुळं इथपर्यंत पोहोचले आहे,मुलींना शिक्षण देणं महत्त्वाचं असतं. लग्न हे मुलीच्या आयुष्यातील शेवटचं ध्येय असत नाही. शिक्षण झालं की मुलीचं लग्न करायचं हा विचार बदलणं गरजेचं आहे.
पदवी झाली तिचं लग्न करणं हा विचार बदलावा. पदवी झाल्यानंतर मुलगी तिच्या पायावर उभी राहिल्यास आपण महिला सशक्तीकरणाकडे जातो हे समजणं महत्त्वाचं आहे, असं ऋचा कुलकर्णी म्हणाली.
ऋचाचे वडील काय म्हणाले?
बीड शहरानं खूप सहकार्य केलं, बीडच्या लोकांनी खूप सहकार्य केलं. बीडच्या लोकांचे उपकार आहेत, त्याच्यामुळं आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे. गेल्या 35 वर्षांपासून पिग्मी एजंट म्हणून काम केलं.
एक रुपयाची फसवणूक केली नाही. बीड शहरातील सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, यामुळं इथपर्यंत पोहोचलो, हे सांगत असताना विठ्ठल कुलकर्णी भावूक झाले होते. लेकरानं कष्टाचं चीज केलं, याच्यामुळं आनंद वाटतो, असंही विठ्ठल कुलकर्णी म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज