टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात व शाळेत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह उंचावला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
सीमेवर कार्यरत असलेले मेजर कुणाल घोडके, सचिन शिंदे व हर्षद माळी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. त्यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे, गावचे प्रथम नागरिक व लोकनियुक्त सरपंच लव्हाजी लेंडवे, उपसरपंच सुयोग बनसोडे, माजी सदस्य दत्तात्रय स्वामी, हिम्मतराव भाकरे, ग्रामविकास अधिकारी शहाजी इंगोले, माजी उपसरपंच भारत लेंडवे, सदस्य दिगंबर माळी, सुनील शिंदे, संतोष शिंदे, रामेश्वर आवताडे, गणेश नागणे, विष्णुपंत भाकरे, अंकुश लेंडवे, सलीम शेख, अंकुश डांगे, समाधान लेंडवे, पोपट भाकरे,
जि प शाळेचे मुख्याध्यापक सुरेश ढोले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामचंद्र बनसोडे, उपाध्यक्ष भारत शिंदे, सदस्य लहू आवताडे, दीपा स्वामी, रोहिणी कुंभार,माया शिंदे, वैशाली कोरे, सरताज नदाफ, संभाजी कांबळे, सत्यवान लेंडवे, शोभा स्वामी, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील वेळापुरे, आबासो माळी, यांचेसह सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याबरोबरच आंधळगावच्या इतिहासातील एक अभिमानास्पद क्षणही साजरा करण्यात आला. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला १५० वर्षे पूर्ण झाली असून, या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी, मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेवर विद्युत रोषणाई करून परिसर उजळून निघाला होता.
शाळेच्या गौरवशाली वाटचालीत देशभर आपला ठसा उमटविणारे अनेक विद्यार्थी घडले आहेत. प्रशासकीय, शासकीय, सामाजिक तसेच खाजगी क्षेत्रात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
आजही माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या सामुदायिक प्रयत्नातून शाळेचे स्वरूप काळानुरूप बदलले आहे. डिजीटल संगणक लॅब, रंगरंगोटी, सुविचार, प्रेरणामूर्तींचे इतिहासपट, शैक्षणिक सजावट या उपक्रमांमुळे शाळेला नवे व देखणे रूप प्राप्त झाले आहे.
याप्रसंगी सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, आंधळगावच्या जिल्हा परिषद शाळेने दीडशे वर्षांचा प्रवास पूर्ण करताना हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पाया दिला आहे. ही शाळा फक्त ज्ञानाचे दालन नसून गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे केंद्र आहे.
आज शाळेचे डिजीटल रूपांतर होताना आम्हा ग्रामस्थांना अपार अभिमान वाटतो. पुढील पिढ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी आपण सर्वजण या शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे ते म्हणाले.
शाळेच्या या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामुळे आंधळगाव ग्रामस्थांमध्ये नवा उत्साह संचारला असून, स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज