टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन राजस्थान राज्यात नेल्या प्रकरणी आरोपी गणेश पुतळाप्पा नरळे याला जोधपूर मधून ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
दरम्यान आरोपीस पोलीसांनी अटक करुन पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी, वरील आरोपीने एका अल्पवयीन मुलीस ग्रामीण भागातून फूस लावून पळवून नेले होते.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची एक टीम तयार करुन अपहरणकर्त्या मुलीचा व आरोपीचा शोध जिल्ह्याच्या कानाकोपर्यात घेण्यात आला मात्र ते मिळून आले नाहीत.
सदर घटनेत पळवून नेण्यास मदत करणार्या आरोपीची पोलीसांनी माहिती काढून त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हा राजस्थान राज्यातील जोधपूर येथे गेल्याची गोपनीय माहिती मिळताच
पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव, डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रणजीत माने यांनी पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख,
महिला पोलीस हवालदार शबनम शेख, महिला पोलीस शिपाई सुवर्णा मोरे, पोलीस शिपाई सुरज देशमुख यांचे पथक राजस्थान येथे पाठवून आरोपीस ताब्यात घेवून मंगळवेढ्यात आणण्यात आले.
तपासीक अंमलदार शेख यांनी आरोपी गणेश नरळे यास दि.13 रोजी अटक करुन पंढरपूर जिल्हा सत्रन्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज