mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 12, 2021
in शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती.

मात्र आता राज्य मंडळाने ही आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तारखेपर्यंत नियमित शुल्कासह आवेदनपत्रे भरता येणार आहेत.

तसेच पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) “ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट’ घेणारे विद्यार्थी याची आवेदनपत्रे देखील माध्यमिक शाळांनी याच कालावधीत भरायची आहेत.

माध्यमिक शाळांना चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बॅंकेत शुल्क भरण्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट चार फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे.

दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत ही आवेदनपत्रे भरायची आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

यावर्षी नव्याने फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता दिलेल्या कालावधीत आवेदनपत्रे भरू नयेत, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च-2020 किंवा नोव्हेंबर-डिसेंबर 2020मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच 2021मध्ये श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरून परीक्षा देता येणार आहे.

त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा देता येणार नाही, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावीपरीक्षामुदतवाढ

संबंधित बातम्या

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 13, 2026
कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

सुवर्णसंधी! पोलीस खात्यात तब्बल एवढ्या जागांसठी होणार भरती; गृहमंत्र्यांची घोषणा...

ताज्या बातम्या

घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा