mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 15, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स। 

गेल्या 30 वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 24  गावातील दुष्काळी भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली असून त्याचे टेंडर देखील निघाले असल्याने लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

आमदार समाधान आवताडे हे आमदार झाल्यापासून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. कित्येक वेळा मुंबई, दिल्ली दौरे करून ही योजना अखेर मंजूर करून घेतली.

योजना मंजूर करून तीन दिवस झाले असतानाच लगेच टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाल्याने आता खरोखरच ही योजना प्रत्यक्षात लवकर मार्गी लागणार असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील टेंडर

मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतर्गत पंपगृह टप्पा क्र. १, उर्ध्वगामी नलिका क्र. १, शेलेवाडी मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम तसेच योजना कार्यान्वितीकरण करणे, पाच वर्ष परिचलन, देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणीवापर संस्था स्थापन करून सर्व वितरण व्यवस्था हस्तांतरण करणे हे पहिल्या टप्प्यातील टेंडर निघाले आहे.

निविदेची किंमत रुपये:- ७६०८.७५ लक्ष, ई-निविदा उपलब्ध कालावधी दिनांक १५/०३/२०२४ ते दिनांक ०४/०४/२०२४., Geo-tagging कालावधी दिनांक २२/०३/२०२४ ते दिनांक २६/०३/२०२४. ई-निविदा उघडण्याचा दिनांक ०८/०४/२०२४ रोजी उघडण्यात येणार आहे.

उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीने जनतेच्या स्वप्पूर्तीचा साक्षीदार होण्याचे भाग्य – समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला मंगळवेढा तालुक्यातील २४ गावे उपसा सिंचन योजनेची मंजुरी घेऊन पात्र ठरलो ही माझे परमभाग्य असल्याचे भावनिक उद्गगार मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.

आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या ग्रामस्थांनी व मतदार संघातील जनतेने आमदार आवताडे यांचा या कामगिरीबद्दल कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार आवताडे हे बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, विविध विकास कामांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांचा मतदार संघाचा निधीचा वनवास संपुष्टात आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांचे या योजनेसाठी असणारे योगदान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले जाईल.

दुष्काळी भागातील जनतेचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या जीवनामध्ये राजयोग निर्माण करणाऱ्या आमदार आवताडे यांची कामगिरी मतदार संघातील जनता कदापि विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच दक्षिण भागातील शेतकरी राजू कुल्लोळी यांनी बोलताना सांगितले की, या योजनेला मंजुरी मिळाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची असणारी प्रतीक्षा अखेर संपली आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा आमदार म्हणून समाधान आवताडे यांची विश्वासहर्ता या कामगिरीमुळे आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच तनाळी मठाचे मठाधिपती ह.भ.प.दाजी महाराज, पंढरपूर पंचायत समिती माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जमदाडे, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, यशोदा पतसंस्था चेअरमन नीला आटकळे, माजी सरपंच मरगु कोळेकर, सरपंच अनिल पाटील, सुरेश कांबळे, युवक नेते प्रसाद कळसे व व इतर ग्रामस्थ नागरिकांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या कामगिरीबद्दल  आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अविरतपणे प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे. आमदार आवताडे यांनी केलेल्या अविस्मरणीय कार्यामुळे मंगळवेढा तालुक्याचे लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर काही राजकीय मंडळींनी भविष्यकाळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: स्पर्धा सुरू केली आहे.

परंतु आपण कोणतीही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला सफलता प्राप्त झाली.

त्यामुळे यापुढील काळामध्ये ही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मतदार संघातील विविध पाणी योजना व इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेल असा ठाम विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांना प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक, शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा उपसा सिंचन योजना

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 17, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

Breaking! निवडणूक आयोगाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबाबत महत्वाचा निर्णय; आचारसंहिता कधीपासून...

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 17, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..