मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा शहरामध्ये अतिक्रमणामुळे मोटरसायकल पार्किंग, वाहतूकीस अडचण, अपघात, एस.टी डेपो, व्यापारी व नागरिक यांच्या तक्रारीमुळे दि.18 ऑगस्ट रोजी IPS प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार
रहदारीसाठी, पार्किंगसाठी, एस.टी डेपोसाठी व शाळेतील मुलांसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाद्वारे आज दि.25 ऑगस्ट रोजी अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार होती.
नागरीकांच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होवू नये यासाठी नगरपरिषदेकडून दि.21 ऑगस्ट रोजीच्या वृत्तपत्रातून जाहीर प्रसिध्दीकरण करण्यात आले होते.
त्याचबरोबर दि.21 ते 24 ऑगस्ट पर्यंत शहरातून दवंडी देण्यात आली होती. तसेच शहरातील व्यवसायिकांना नगरपरिषद कर्मचारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष भेटून सूचना देण्यात आल्या होत्या.
पर्यायी जागेची व्यवस्था
आज दि.25 ऑगस्ट रोजी रहदारीस अडथळा होणारे संत दामाजी चौक, एस.टी डेपो समोरील व शिवप्रेमी चौक येथील अतिक्रमण व्यवसायकांनी स्वयंस्फूर्तीने काढून घेतले आहे. तसेच रस्त्यावरील फळ विक्रेते यांना पर्यायी व्यवस्था आठवडा बाजार व जुनी मंडई या ठिकाणी करण्यांत आली आहे.
पाणीपुरी, चायनीज सेंटर यांना गणेश विहीर व गणेश बागेसमोर व्यवस्था केली आहे. इतर छोटे-मोठे व्यवसायिक यांना मारुती पटांगण या ठिकाणी व्यवस्था करण्यांत आली आहे. हे पाहता अतिक्रमण मोहीमेस तूर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे.
दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी नगरसेवक अजित जगताप व प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे यांनी अतिक्रमणा न काढण्यासाठी प्रयत्न केले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज