टीम मंगळवेढा टाइम्स ।
ऊस भरून कारखान्याकडे चाललेल्या ट्रॅक्टरला टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात ट्रॅक्टरचे इंजिन कोसळल्याने त्याखाली दबून ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला.
हा अपघात रविवारी रात्री साडेसात वाजता माचणूर-मंगळवेढा रस्त्यावर झाला. अजिनाथ अशोक शिंदे (वय ३४, रा. पिंपळ्याचीवाडी, ता. शिरूर, जि. बीड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद हरिराम थोरवे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, माचणूर-मंगळवेढा दरम्यान हॉटेल रुद्रच्यापुढे रविवारी सायंकाळी
फिर्यादी हरिराम थोरवे व त्यांचा मामेभाऊ अजिनाथ शिंदे हे ट्रॅक्टर (एमएच १६ एव्ही ६६८८) दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून कचरेवाडीच्या युटोपियन कारखान्याकडे जात असताना
हॉटेल रूद्रजवळ पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच २५ यू ०२९८) हा भरधाव वेगात वाहन चालवून ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीस यास पाठीमागून जोराची धडक दिली.
त्यात अजिनाथ शिंदे जागीच ठार झाला. याप्रकरणी टेम्पोच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत पवार करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज