मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील जनता निरनिराळ्या समस्यांना तोंड देत असून अधिकाऱ्यांकडून समस्या सोडवण्यासाठी टाळाटाळ होत आहे.
त्याचबरोबर २०१३ नंतर आमसभा झाली नसल्याने तालुक्यातील अधिकाऱ्यावर कुणाचा वचक राहिला नाही.
तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनाही पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळत नाही, अधिकाऱ्यांकडून जाणून-बुजून हेलपाटे मारायला लावले जात आहेत.
आ.आवताडे यांनी याची दखल घेत सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत अधिकारी कर्मचारी व गाव पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलवत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय किल्ला भाग, मंगळवेढा येथे आज सकाळी १० वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीमध्ये खरीप हंगाम पेरणी पूर्व तयारी संदर्भात शतकऱ्यांच्या असणाऱ्या अडी-अडचणी, ४० गावे भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु करण्याचे दिशेने आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक तयारी, पी. एम. किसान योजनेतील अडचणी दूर करून वंचित शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे,
ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची योजना सुकर आणि सुलभ होण्यासाठी राबवली जाणारी जलजीवन योजनेचाही या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे.
तरी सदर आढावा बैठकीसाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शेतकरी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
जलजीवन योजनेतील कामांबाबत तक्रारी
सध्या महसूल विभागामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे अर्ज करूनही मिळत नाहीत. महसूल विभागाचे कर्मचारी मालक असल्यासारखे वागत आहेत.
शेतकऱ्यांचे उतारे दुरुस्त होऊन मिळण्यास विलंब होत आहे, पाणीपुरवठा अंतर्गत सुरू असणाऱ्या जलजीवन कामाबाबत ही अनेक तक्रारी येत आहेत, स्थानिक प्रश्नावर आज अधिकाऱ्यांची झाडाझडती होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज