मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
बदलीसाठी सरकारी कर्मचारी कोणत्या थराला जातील आता हे सांगता येत नाही. बदली व पगारवाढ, ज्येष्ठता यादीसाठी आत्तापर्यंत अपंग नसलेले देखील अपंग झाले, इथपर्यंत ठीक होते.
पण आता आंतरजिल्हा बदली करून घेण्यासाठी महिला शिक्षिकेने चक्क लग्नगाठ लावून पराक्रम केल्याची चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे.
पाथर्डी तालुक्यातील एका शिक्षिकेने आपल्या नवऱ्याबरोबर गुपचूप लग्न करून एका आपत्याला जन्माला घातले आणि सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात बदलीचा लाभ घेतला आणि विविध खोटे दाखले सादर केल्याचा आरोप एका महिलेने केला.
या प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर आपण आत्महत्या करू असा इशारा तिने दिला. त्यामुळे त्यानंतर या विषयावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याने नगर जिल्ह्यात या दोन बायकांच्या नवऱ्याची व भन्नाट शिक्षिकेची चांगलीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली थोडक्यात माहिती अशी, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका शिक्षकाच्या पत्नीने तक्रार केली आहे. ज्यामध्ये तिने नमूद केले की, नगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने माझ्या पतीशी गुपचूप विवाह केला असून, सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
संबंधित महिला शिक्षिका विवाहित असून देखील, घटस्फोटीत असल्याचे कागदपत्र सादर करून तिने स्वतःची सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली करून घेतली आहे.
तिने प्रशासनाची फसवणूक केली असून ग्रामसभेचा ठराव नसताना देखील मुख्यालयात राहत असल्याचे खोटे स्व साक्षांकित घोषणापत्र दाखल केले आहे व घरभाडे भत्ता घेतला आहे.
त्यामुळे तिची बदली रद्द करून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आपण आत्मदहन करू अशी तक्रार या महिलेने दिली. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित महिला शिक्षिकेची विभागीय चौकशी सुरू केल्याचे समजते.(स्रोत:अहमदनगर न्युज)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज