mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 9, 2026
in मनोरंजन, राज्य
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

आजपर्यंत देशाच्या इतिहासात महाराष्ट्राची ओळख कायमच पुरोगामी राज्य म्हणून राहिली आहे. सांगलीतील एका आगळ्यावेगळ्या विवाहाने महाराष्ट्रातील ही ओळख अजूनही शाबूत असल्याचे नव्याने दाखवून दिले आहे.

सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्याचा एक आदर्शवत लग्नसोहळा नुकताच पार पडला. सूरज आणि मधूमिता या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने आणि विवाहातील अनावश्यक खर्च टाळत लग्नासाठी वापरली जाणाऱ्या रक्कम सामाजिक संस्थांना मदत या भावनेतून साध्या पण अनेक सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडला.

सुरज हा शिक्षण पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या सामाजिक प्रश्नावर काम करतो तर मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. या दोघांनी आपल्या विवाहातील अनावश्यक खर्च टाळत काही रक्कम सामाजिक संस्थांना दान केली.

ईश्वरपूरचा सुरज उर्मिला सुनील तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मधुमिता शोभा-अर्जुन यांनी आडनाव न लावता सर्वजण समान या भावनेतून सामाजिक काम करणाऱ्या या दोघांनी आपल्या विवेकनिष्ट सहजीवनच्या नात्यास सुरुवात केली.

लग्नात विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा, पर्यावरण या सप्तपदीच्या पावलावर चालत त्यांनी आपल्या जीवनातील नव्या टप्प्याचा प्रारंभ केला. सुरज आणि मधुमिता यांची ओळख सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून झाली होती. या दोघांची मैत्री झाल्यानंतर पुढे त्यांचे आयुष्याविषयीचे विचार जुळू लागले. त्यामुळे या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुरज आणि मधुमिता या दोघांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. मात्र, तरीदेखील दोघांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यास मंजुरी दिली.

तसेच सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर, असे म्हणत विवाहातील अनावश्यक खर्च टाळत जवळपास 2 लाख रुपये सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली.

लग्नात यामुळे पुस्तक प्रदर्शन, विविध संस्थाच्या कामाची माहिती देणारे प्रधान आणि सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाला पुरस्कृत करणारे विचार दिसून आले. सध्याच्या लाखो रुपये खर्चून भपकेबाज पद्धतीने लग्न करण्याच्या युगात सुरज आणि मधुमिता यांचा सत्यशोधक विवाह एक आदर्श घालून देणारा ठरला आहे.

मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. तर सूरज शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या विषयांवरील सामाजिक प्रश्नांवर काम करतो. नवीन गोष्टी शिकत समाज परिवर्तनासाठी आवश्यक जितकं जमतंय तितकं करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यामुळे लग्नाचं नियोजन करताना दोघांनी ठरवलं की अवाजवी खर्च टाळून तेच पैसे सामाजिक संस्थांना देऊ.

लग्न एकदाच होतं हे आम्हालाही पटतंय, म्हणूनच एका दिवसात ते पैसे अक्षरशः उडवण्यापेक्षा ते विधायक पद्धतीने खर्च करुन लग्नं खऱ्या अर्थाने साजरा करु, स्मरणीय बनवू, ही संकल्पना आमच्या पालकांनीही उचलून धरली आणि ते मिळून 2 लाख रुपये संस्थांना देणगी दिली, असे या दोघांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सांगली बातमी

संबंधित बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 9, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026

ताज्या बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 9, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 9, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा