सांगोला : बाळासाहेब झिंजुरटे
सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी , सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या तिन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आज रविवार दि.7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
सांगोला शहरातील मिरज रोडवर असलेल्या सदानंद मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूर्योदय महिला अर्बनच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेमधील विजेत्यांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी अनिलभाऊ इंगवले दिली.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल आकर्षक भेटवस्तू देखील यावेळी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी , कष्टकरी , पशुपालक तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक, शासकीय नोकरदार त्याचबरोबर होतकरू तरुणांसह समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक गरजांसाठी प्राधान्याने धावून जाणारी आर्थिक संस्था असायला हवी.
हा लोकहितवादी विचार करून दूरदृष्टीने जनमानसाची नेमकी नाळ ओळखणारे अनिलभाऊ इंगवले यांनी आपले सहकारी मित्र जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी यांना सोबत घेऊन या सर्व संस्थांची उभारणी अत्यंत तळमळीने केलेली आहे.
सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधांसह सेवाभावी वृत्तीचा कर्मचारी वृंद आणि विविध प्रकारचे उपक्रम त्याचबरोबर ठेवीवरील आकर्षक व्याजदर यामुळे या संस्था नावारुपास आलेल्या असून ठेवीदाराच्या ठेवींचे संरक्षण आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही या संस्थांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची ही बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा असून सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची आठवी तर सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे.
या कार्यक्रमासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले सर्व स्पर्धक तसेच तीनही संस्थांचे सर्व सभासद बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे, सूर्योदय अर्बन महिला चेअरमन सौ.अर्चना अनिल इंगवले तसेच व्हाईस चेअरमन अनुक्रमे सुभाष दिघे गुरुजी आणि सौ ज्योती जगनाथ भगत उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज