टीम मंगळवेढा टाईम्स।
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्यांच्या निषेधार्थ
आज दि.16 डिसेंबर रोजी मंगळवेढा बंदच्या आंदोलनाला शहरातील सामाजिक, धार्मिक, व्यापारी, शैक्षणिकसह सर्वपक्षीय स्तरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात मंत्री व राज्यपालांसह अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा सपाटाच लावला आहे.
या वक्तव्याच्या निषेधार्थ आज दि.16 डिसेंबर रोजी मंगळवेढा बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंदला सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा जाहीर करत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांनी पत्रक काढून पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, दुपारी निवेदन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली तर चालतील असा आदेश देखील व्यापारी ग्रुपवरती देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज