टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या तीन ते चार दिवसात पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पाहणी केली असता, त्याठिकाणी असलेल्या शिवभोजन केंद्रांवर पार्सल देत असल्याचे आढळून आले, वास्तविक पाहता असे करता येत नाही.त्यामुळे २८ शिवभोजन केंद्रांना नोटीस काढण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये शिवभोजन केंद्र चालवले जात आहेत. गरजूंनी या केंद्रांवर जाऊन जेवण करणे अपेक्षित आहे. शिवभोजन केंद्रावर तशी बसण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
मात्र, कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी पार्सलला परवानगी देण्यात आली होती. पुढे हा प्रकार तसाच चालू ठेवण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती.
या मिळालेल्या पंढरपूरसह सर्व माहितीवरून तालुक्यांतील शिवभोजन केंद्रांची पाहणी केली असता, प्रत्येक ठिकाणी जेवण पार्सल दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
पार्सल देणे हे नियमात बसत नाही. मात्र सर्रास याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. या नोटीसला मिळणाऱ्या उत्तरावरून पुढील कारवाई केली जाणार आहे.
शिवभोजन थाळी केंद्र
मंगळवेढा- ०२, मोहोळ ०१,
करमाळा- ०३, माढा ०४, अक्कलकोट ०२, उत्तर सोलापूर ०२, बार्शी ०२, दक्षिण सोलापूर ०१, सांगोला ०२, पंढरपूर १३, माळशिरस ०१, तीन बंद आहेत. सोलापूर शहरात सध्या १० शिवभोजन केंद्र आहेत. सोलापूर शहरात आणखी ५ जिल्ह्यात १ नवीन शिवभोजन केंद्र मंजूर झाली आहेत.
जेवण केंद्रावरच बसून देण्याचा नियम
पंढरपूरसह इतर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राची पाहणी केली असता , त्या ठिकाणी जेवण पार्सल दिल्याचे आढळून आले आहे . पाहता हे जेवण केंद्रावरच बसून देण्याचा नियम आहे.
कोरोना काळात हा नियम शिथिल केला होता. मात्र आता सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे. पार्सल देता येत नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोटिसा काढण्यात आल्या आहेत. – वर्षा लांडगे , जिल्हा पुरवठा अधिकारी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज