टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळावेढा शहरातील फूगारे गल्लीतील एका 36 वर्षीय महिलेने अज्ञात कारणावरून पंख्याच्या हूकाला आौढणीच्या साह्याने गळफास घेऊन ऐन दिवाळीत सणात आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेची पोलिसांत आकस्मात मयत नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयत अंबिका विनोद धनवडे (वय 36 रा.वाटंबरे ता.सांगाेला हाल्ली राहणार फूगारे गल्ली मंगळवेढा) हिने दिनांक 15 रोजी दुपारी १ वाजता अज्ञात कारणावरून पत्राच्या लोखंडी अँगल ला
लावलेला फॅनच्या हूकास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर अजिंक्य गूंगे यांनी दिल्यावर पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तूकाराम कोळी करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज