टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भर चौकात युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दरम्यान, भगव्या गमजाने गळफास घेतल्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत, मात्र मृतदेह खाली उतरवण्यास सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राज्यातील अनेक युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपला जीव गमाविला.
कालपासून आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. आत्महत्या करू नका, हिंसक वळण थांबवा, आंदोलनं शांतता मार्गाने करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज