टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास अण्णाराव चेळेकर यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
दोनच दिवसापूर्वी समाज कल्याण विभागाच्या सभापतीच्या चेंबरमध्ये लाच घेताना एकास अटक करण्यात आली होती.
सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली.
यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होणेकरीता अर्ज दिला होता. सदर अर्जावर मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ०८.०९.२०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी करून, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे.
याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटी करप्शन ची दुसरी कारवाई आहे .समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याला तीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेमुळे आज बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज