टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील आपल्या प्रभाग व शहरातील विकास कामांना मंजुरी देण्यासाठी विषय सुचवा असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी मंगळवेढा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना केले आहे.
नियोजित मंगळवेढा नगरपरिषद सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामे सुचविणे बाबत मंगळवेढा नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांना लेखी पत्र दिले आहे.

तर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनाही धोरणात्मक विकास कामांना न्याय मिळवून देण्यासाठी विषय देणेबाबत जाहीर आवाहन केले आहे.

नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे मंगळवेढा नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांना व प्रतिष्ठित नागरिकांना विकास कामाबाबत लोकाभिमुख कामकाजाची सुरूवात झाली आहे.

नगराध्यक्षांनी निवडणूकीतील विरोध किंवा राजकीय गटा तटाच्या राजकारणला महत्व न देता शहराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी आवाहन केलेल्या पत्रात मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या मुलभूत तथा पायाभूत सुविधा व मंगळवेढा शहराच्या धोरणात्मक विकास कामांसाठी मंगळवेढा नगरपरिषद मध्ये जनतेने आपणास आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सन्मानाने पाठविले आहे
त्या लोक सन्मानाचा आदर करणे व आपल्या प्रश्नांची विचारपूस करून त्या समस्या सोडविणे ही थेट जनतेतून निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माझे कर्तव्य आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा यांचा अजेंडा निर्गमित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने सभेमध्ये आपल्या प्रभागातील किंवा शहरातील सार्वजनिक विकास कामांना समाविष्ट करण्यासाठी आपणाकडून लेखी स्वरूपात विकास कामांचे विषय तात्काळ देऊन लोक सन्मानाचा आदर करावा.

जेणेकरून सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा मध्ये सदर विषय मंजूर करून लोकाभिमुख विकास कामांना मंजुरी देता येईल. मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आपले सहकार्य मनापासून आवश्यक आहे.
तरी आपण मंगळवेढा शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. तसेच चला एकत्र येऊया !स्वच्छ,सुंदर व विकासाभिमुख मंगळवेढा शहराची निर्मिती करूयात! असे विकासाभिमुख आवाहन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










