टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम अखेरीला उसाचे बिल प्रतिटन २७०१ रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या सोयीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांमधील खात्यांमध्ये वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
याशिवाय हंगाम अखेरची ऊस तोडणी वाहतूक बिलेही संबंधित बँका व पतसंस्थांकडे ठेकेदारांच्या नावावर यापूर्वीच वर्ग केली आहेत.
कारखान्याच्या शेती विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबंधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
श्री.पाटील म्हणाले, कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असतानाही सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून हंगाम अखेर गळितास आलेल्या संपूर्ण उसाची बिले, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची बिले वेळेत देण्याचे काम संचालक मंडळाने केले.
त्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, जिजामाता पतसंस्थेचे रामकृष्ण नागणे यांच्यासह माजी अध्यक्ष व माजी संचालकांसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदारांचे सहकार्य मिळाले.
याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांच्यासह सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख उपस्थित होते.
३ लाख ८० हजार ५३५ मे. टन उसाचे गाळप
■ श्री. पाटील म्हणाले, चालू गळीत हंगामात तीन लाख ८० हजार ५३५ मे. टन उसाचे गाळप करून तीन लाख ८४ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या हंगामातील उसाच्या वाढीकरिता कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने, पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज