टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील जय भवानी हौसिंग सोसायटी मधील कुटुंब रस्ता रुंदीकरण मध्ये बेघर होण्याच्या मार्गावर होते.
कोल्हापूर – नागपूर राष्ट्रीय महामार्ग च्या रस्ता कामासाठी जय भवानी हौसिंग सोसायटी तेथील वास्तव करत असलेल्या कुटुंबाना बेघर होण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यासाठी आदित्य हिंदुस्तानी व चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शना खालील रास्ता रोको आंदोलन व प्रांतकार्यालया समोर थाली नाद आंदोलन करुन शासनाला गंभीर दखल आंदोलनाची घेण्यात आली.
त्यासंदर्भात जिल्हाधिकारी स्तरावर मीटिंग घेण्यात आले होते याची दखल घेवुन कोल्हापूर– नागपूर राष्ट्रीय महामार्ग च्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित कुटुंबाना पुनर्वसन करण्यासाठी शासना कडून आर्थिक मोबदला ही कुटुंबाच्या खात्यावर जमा झालेले आहेत.
त्यामुळे बेघर होण्याच्या मार्गावर असलेल्या कुटुंबामध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे ही वंचित,उपेक्षित,शोषितांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार असे मत आदित्य हिंदुस्तानी यांनी व्यक्त केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज