टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्समध्ये आज गुरुवार दि.7 जानेवारी पासून पायल,ठुशी-नथ,राशीरत्नांचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा उद्घाटन शुभारंभ सकाळी 10.30 वा. करण्यात येणार असल्याची माहिती संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या पत्नी सौ.पूजा रावडे व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या पत्नी सौ.संगीता गुंजवटे व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या पत्नी सौ.परचंडराव या उपस्थित राहणार आहेत.
मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी यांची गेल्या १०० वर्षांपासून परंपरा असलेली पेढी खास ग्राहकांच्या आग्रहाखातर नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे.
प्रमुख उपस्थितीत महिला हॉस्पिटलच्या डॉ.पुष्पांजली शिंदे,शि.प्र.पतसंस्था चेअरमन तेजस्विनी कदम, डॉ.निकिता सारडा,डॉ.तनुजा होनमाने,सौ.अश्विनी खटावकर, सौ.सुप्रिया जगताप, सौ.वंदना तोडकरी,डॉ.प्रिती शिर्के, डॉ.शबनम सय्यद आदीजन उपस्थित राहणार आहेत.
खास ग्राहकांचे हित जोपासत मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित असतात.
नूतन वर्षाच्या सुरुवातीस खास महिला ग्राहकांच्या पावलांची शोभा वाढविण्यासाठी आज दि.7 जानेवारी ते दि.20 जानेवारी पर्यंत पायल महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये आग्रा पायल,सेलम पायल,फॅन्सी पायल,हैदराबादी पायल,बॉम्बे पायल,राजकोट पायल,जोडव्यांच्या नानाविध डिझाईन्स असंख्य व्हरायटीज मिळणार आहे.
लग्नसराईत महिलांना एकाच छताखाली सर्व दागिन्यांची खरेदी करता यावे यासाठी ठुशी-नथ महोत्सव आज दि.7 जानेवारी ते दि.20 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
राशींच्या अस्सल रत्नांची पारख असलेल्या रत्नांचे भव्य प्रदर्शन व विक्री.आज दि.7 जानेवारी ते दि.11 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक संदीप रत्नपारखी यांनी केले आहे.
यावेळी ग्राहकांना मोफत मुंबई येथील तज्ञ ज्योतिष सल्ल्यासह राशीनुसार अस्सल भाग्यरत्नांची पारख करून दिली जाणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज