mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास ‘हे’ आमदार देणार राजीनामा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
सोलापूर ब्रेकिंग : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास ‘हे’ आमदार देणार राजीनामा

 

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी 58 मोर्चे काढले. याचे फलित समाजाला मिळाले होते.आमच्या सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करून आरक्षण दिले. 

उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आपण कमी पडलो असे वाटते. मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत.

आमदारकीपेक्षा समाज महत्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज सोलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.


सकल मराठा समाजाच्यावतीने जुळे सोलापुरातील डी मार्ट येथून आमदार देशमुख यांच्या घराकडे मोर्चा काढला. त्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले.

त्यावेळी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधला. आरक्षणाविषयीची बाहू सर्वोच्च न्यायालयात ठोस पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


मराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी जे करावे लागेल ती करण्याची आपली तयारी आहे. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी समाजाची भावना आहे.

माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही, त्यासाठी आपण कोणताही त्याग करू, असेही देशमुख म्हणाले.

मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल, असे वाटत नाही, असेही देशमुख म्हणाले. 


दरम्यान, डी मार्ट येथून निघालेल्या मोर्चामध्ये राजन जाधव, श्रीकांत डांगे यांच्या अनेक मराठा समाजातील कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. (सकाळ)

BJP MLA Subhash Deshmukh will resign if Maratha community does not get reservation

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कोण कोणामध्ये होणार थेट लढत? संपूर्ण यादी बघा…

January 27, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटात राष्ट्रवादीकडून सिध्देश्वर रणे यांना उमेदवारी; शरद पवार यांच्या ‘तुतारी’ला एकमेव जागा

January 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय खळबळ! अनिल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अनपेक्षित माघार; अनेक कार्यकर्ते आक्रमक; निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

January 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत जिल्हा परिषद ‘या’ गटातून निवडणूक रिंगणात उतरणार; विरोधी गटातील नेत्यांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता

January 20, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेता असावा तर असा..! कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत मंगळवेढा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून घेतली माघार

January 20, 2026
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

भाजपच्या आजी-माजी आमदारांकडून ZP साठी स्वतंत्र मुलाखती; परिचारकांकडून गावभेट दौरा, तर आवताडेंनी इच्छुकांना बोलावले मंगळवेढ्यात

January 17, 2026
सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक; सुमारे ‘एवढ्या’ हजार मतांनी शालन शिंदे विजयी

सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक; सुमारे ‘एवढ्या’ हजार मतांनी शालन शिंदे विजयी

January 16, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
Next Post
चिंतेत भर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा एकोणिसावा बळी; सांगोल्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ

चिंतेत भर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा एकोणिसावा बळी; सांगोल्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा