mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चित्र बदलले! अनेक गावांत उपसरपंच निवडी गंमतीशीर होणार; विजयी झालेला प्रत्येक सदस्य दावा करू शकणार; ‘टाय’ झाले तरच यांना असणार अधिकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 5, 2023
in राजकारण, सोलापूर
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।

सोलापूर जिल्ह्यातील १८९  ग्रामपंचायतींच्या सदस्यासोबत सरपंचांच्याही निवडी पार पडल्या असून, आता उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरपंच मतदारांनी तर उपसरपंच सदस्यांतून निवडले जाणार असल्याने अनेक गावांत गंमतशीर निवडी होण्याची शक्यता आहे.

२०२२ मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरअखेर झाल्या असून, सदस्यांसह थेट सरपंचही निवडल्याने आता उपसरपंच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.

जिल्ह्यात १५ सरपंच व ३२९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १७४ सरपंच व १४१८ सदस्य निवडीसाठी मतदान झाले. निकालाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर उपसरपंचपदाच्या निवडीसाठी १५ दिवसांचा कालावधी गेला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावरून त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांनी उपसरपंच निवडीचे कार्यक्रम लावले आहेत. सरपंचपदासाठी आरक्षण असते. मात्र, उपसरपंच निवडीसाठी विजयी झालेला प्रत्येक सदस्य दावा करू शकतो.

बहुतांशी गावांत बहुमत असलेल्या पॅनलचा प्रमुख अथवा ते ठरवतील ते उपसरपंच होऊ शकतात. आतापासूनच आपल्या गळ्यात उपसरपंचाची माळ पडण्यासाठी पॅनलप्रमुख काम करीत अनेक अनेकजण फिल्डिंग लावले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून याच ग्रामपंचायतीचे मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच निवडले होते. मधल्या काळात थेट सरपंच न निवडता सदस्यांतून सरपंच व उपसरपंच निवडले गेले.

मात्र, राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय झाल्याने उपसरपंच निवडीला महत्त्व आले आहे. मतदान झालेल्या अनेक गावांत सरपंच एका गटाचा, तर सदस्य दुसया गटाचे विजयी झाले आहेत. त्यामुळेच उपसरपंच निवडीत गंमतीजमती होण्याची स्थिती आहे.

‘टाय’ झाले तरच सरपंचाला अधिकार

उपसरपंच निवडीसाठी व मतदानाच्या प्रक्रियेत समसमान मते पडली तर अशी दोन मते देण्याचा अधिकार सरपंचांना दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने केवळ एक मताचा अधिकार अन् तोही उपसरपंच निवडणूक लढविणाऱ्यांना समसमान मते मिळाली तरच मतदान करण्यास परवानगी देणारा निर्णय दिला आहे.

जिल्हाधिकायांनी २९ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात उपसरपंचांच्या निवडी करण्याबाबत तहसीलदारांना कळविले आहे. त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांनी ६ ते ९ जानेवारीदरम्यान उपसरपंच निवडी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

सरपंच हे सदस्य म्हणून निवडून न आल्याने अधिकार नाही

राज्य शासनाने थेट सरपंच झालेल्यांना सदस्य म्हणून एक वेळ व समसमान मते पडली तर एक वेळ असे दोन वेळा मतदानाचा अधिकार देणारा आदेश ३० सप्टेंबर रोजी काढला होता.

मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या आदेशाला स्थगिती देत सरपंच हा सदस्य म्हणून निवडून आला नसल्याने त्याला मतदान करता येणार नाही. मात्र, उपसरपंच निवडीत समसमान मते पडली तरच मतदान करता येईल, असा निर्णय दिला असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील अभिजित कुलकर्णी व अॅड. सागर रोडे यांनी सांगितले. (स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपसरपंच निवड

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 8, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन; गौरी गणपती सजावट स्पर्धेचे होणार वितरण

September 7, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षणाची प्रत्येक तालुक्यात किमान ‘इतके’ हजार प्रमाणपत्र वाटप करा; महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांचा आदेश; सेवा पंधरवडा राबवला जाणार

September 6, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘डीजे’ बंदी आदेशावर कोर्टाचे शिक्कामोर्तब; स्थगितीची याचिका फेटाळली

September 5, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनच्या गॅझेटमध्ये; कुणबी दाखला मिळू शकतो; ‘या’ तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरणार

September 3, 2025
Next Post

संजय सलगर यांचे यूपीएससी परीक्षेतील यश हे मंगळवेढा तालुक्यासाठी अभिमानास्पद; डॉ.नंदकुमार शिंदे

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 11, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 11, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मोठा निर्णय झाला; गुन्हे मागे घेण्यासाठी आता नवा निकष

September 10, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा