मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील त्यांच्या बदलीनिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करीत निरोप दिला.
मंगळवेढ्याच्या पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्याप्रती अशी घटना पहिल्यांदाच घडली.
राजश्री पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली त्याबद्दल मंगळवेढा येथील उपविभागीय कार्यालयाच्या वतीने निरोप तर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे,
भिमराव मोरे, दिगंबर भगरे, समाधान फुगारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दावल इनामदार आदीसह उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील म्हणाल्या की पोलीस दलात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवेढ्याचा पदभार मिळाला.
कामाचा फारसा अनुभव नव्हता, मंगळवेढ्यात कामास सुरूवात करताना सुरुवातीला काझी प्रकरण, रस्ते भरपाई व इतर गुन्ह्याचे प्रमाण जास्त होते.
मात्र या पदभार घेतल्यानंतर स्वतःची एक प्रतिमा निर्माण करावयाची संधी मिळाली. शिवाय मंगळवेढ्याची प्रतिमा बदलायची होती म्हणून काम करताना कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मनुष्य बळ कमी असताना देखील कर्मचाऱ्यांनी काम केले,
अवैध धंद्यावर सातत्याने केलेल्या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली,इथल्या कार्यालयाच्या इमारतीची परिस्थिती व वाढलेले गुन्हे पाहता मोठी भीती मनामध्ये होती.
दरम्यान पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच तालुक्यातील अवैद्य धंद्याबद्दल विधिमंडळाच्या अधिवेशनातील झालेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे देता आले.
तालुक्यातील वाढलेला गुन्ह्याचा दर कमी झाला. सांगोला व मंगळवेढा कार्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाळू कारवाई, दारू धंद्यासह व अन्य अवैध धंदयावर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली गेली,कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयाची तपासणीत अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले.
यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पाठबळ दिले. चुकले तर माफ करू पण जाणूनबुजून चुक केली तर माफी नाही.खाकीशी गद्दारी करू नका. असा दिला. मी ही माझ्या कर्मचाऱ्याला तोच सल्ला दिला.पदभार घेतल्यानंतर
पार्किंगची सुविधा नसलेल्या जुन्या काळातील कमी जागेतील या कार्यालयाचे स्थलांतर अद्यावत इमारतीमध्ये करता आलं.त्यासाठी अनेकांनी मदत केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज