टीम मंगळवेढा टाईम्स।
बारावी विज्ञान शाखेचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील किरण भाऊ पाटोळे (वय १७) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
किरण पाटोळे ही नातेपुते येथील डॉ. बा. ज. दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. नुकतीच बारावी विज्ञान शाखेची परीक्षा संपली होती. परीक्षा झाल्यापासून ती सतत उदास होती. ती सतत आपल्या आईला मला पेपर अवघड गेला असल्याचे सांगत होती.
गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे आपल्या भावंडाबरोबर ती गप्पा मारत बसली असता अचानक मला कपडे बदलायचे आहेत असे सांगून घरामध्ये गेली. त्यानंतर आतमधून दरवाजा लावून घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने तिने गळफास घेतला.
बराच वेळ ती बाहेर न आल्याने खिडकीतून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी तिला नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शवविच्छेतदानंतर डॉ. नमता व्होरा यांनी गुरुवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
या घटनेची डॉ. दाते प्रशालेतील शिक्षकांना कोणतेही कल्पना नाही. शिक्षकांना याबाबत अधिक विचारले असता ते म्हणाले, पेपर कसे गेले हे आम्ही सांगू शकत नाही.
या प्रकरणी नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महारूद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल जावेद जमादार करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज