टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य शासनाने नियमाचे पालन करत नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मंगळवेढा तालुक्यातील तब्बल ११ हजार १७८ विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली.
गेल्या आठ महिन्यापासून शाळेच्या आवारातून येणा – जाणाऱ्या नागरिकांना सकाळच्या सत्रामध्ये प्रार्थनेचे सूर ऐकावयास मिळत होते. शिवाय विद्यार्थ्यांचा कलकलाट व झाडाझुडपाने शाळेचा परिसर सुसज्ज असा परिसर होता.
परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन केल्याने शाळेच्या वार्षिक परीक्षा देखील झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत हा प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे जूनपासून शाळा सुरु झाली नाही.
परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार तालुक्यातील ५५ माध्यमिक शाळांमधील ४८४ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली.
यामध्ये काही शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने त्यांना घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात १२ हजार ९७४ विद्यार्थी हे नववी ते बारावीसाठी पात्र असून त्यामध्ये एक हजार ७९६ पालकांनी शाळा प्रवेशाबाबत संमतीपत्र दिले आहे. ते विद्यार्थी सोमवारी शाळेमध्ये दाखल झाले होते.
प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी असे एका वर्गात जवळपास २० विद्यार्थी बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून दुरावलेले विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते आज कोरोनाच्या दडपणात देखील जवळ आले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज