टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती, केंद्र सलगर बु, येथे शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प झाले आहे. ११ डिसेंबर रोजी शिक्षक प्रतिनियुक्तीचा लेखी आदेश देऊनही संबंधित शिक्षक अद्याप शाळेत रुजू न झाल्याने

संतप्त झालेल्या पालकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कायमस्वरूपी शिक्षक तातडीने नियुक्त करावा, या मागणीसाठी उद्या सोमवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पालकांनी जाहीर केला आहे.

जाधव वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ मध्ये एकूण २८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, येथे एकही कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर पंचायत समिती शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व आरटीआय अॅक्टनुसार शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

पंचायत समिती (शिक्षण विभाग) मंगळवेढा यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायगोंडेवस्ती, सलगर बु. येथील शिक्षकाची पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, गटशिक्षणाधिकारी यांचे स्पष्ट लेखी आदेश असूनही संबंधित शिक्षक रुजू न झाल्याने शाळा अजूनही शून्य शिक्षक अवस्थेत असून, सध्या केवळ एका तात्पुरत्या शिक्षकावर शाळेचा डोलारा अवलंबून आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू
जाधववस्ती शाळा अनेक दिवसांपासून शिक्षकांविना आहे. प्रतिनियुक्तीचा लेखी आदेश देऊनही शिक्षक रुजू होत नाही. लहान मुलांचे शिक्षण पूर्णतः ठप्प झाले असून हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे.

त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी सोमवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी घेतला आहे.- संगमेश्वर येळदरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, जाधववस्ती

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










