टीम मंगळवेढा टाईम्स।
डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने अभ्यासाच्या तणावाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षी संतोष बंडगर (वय १६, रा.निराळे वस्ती,सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
ही घटना रात्री घडली असुन साक्षी ही सोलापुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात छताच्या फॅनच्या हूकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही घटना कुटुंबीयांना कळल्यानंतर लगेच तिला खाली उतरवून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
त्यानंतर तिला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे . या घटनेचा तपास पोलीस नाईक नरेश कामूर्ती करत आहेत.
साक्षी ही अभ्यासात हुशार होती . तिचे वडील चालक आहेत, तर आई घरात असते. तिला एक छोटा भाऊ असून , तो शिक्षण घेतो. दरम्यान , तिने अचानक घरात गळफास घेतल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज