टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवेढा शहर भाजप व वारी परिवार यांच्या वतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत नगरपालिकेस निवेदन देण्यात आले आहे.
मंगळवेढा नगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येक गल्लीमध्ये कुत्र्यांची संख्या वाढली आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा चावा घेण्यासाठी ते मागे धावतात.
रात्री मोठ्या प्रमाणात कुत्रे हल्ला करतात. आतापर्यंत अनेक नागरिक, लहान मुले, जनावरे यांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे.
तरी याचा तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
यावरती मंगळवेढा नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे, सतीश दत्तू, शहर उपाध्यक्ष आनंद मुढे, युवा मोर्चाचे अजीत लेंडवे, शहर उपाध्यक्ष संजय माळी, येताळा खरबडे, प्रफुल्ल सोमदळे, अजय आदाटे, अजय गाडे आदी उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनाने आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ते न पूर्ण केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज