टीम मंगळवेढा टाईम्स ।
महायुतीचे सरकार ५ डिसेंबर रोजी स्थापन झाले आहे. त्यांनी आता मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी. सरकारने नाटक करू नये. त्यांना आम्ही १ महिन्याचा कालावधी देत आहोत.
तोपर्यंत जर सरकारने आरक्षण दिले नाही, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर मराठा समाज पुन्हा संपूर्ण ताकदीने आंदोलनात उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दिला.
जरांगे पाटील म्हणाले की, वैचारिक मतभेद असले तरी अभिनंदन करण्याची, शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे त्या तिघांचे अभिनंदन. पण, त्यांनी आता मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. सरकारने आता जनतेचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.
समाजात जी खदखद आहे ती त्यांना दिसत नसेल; पण इतकी भयंकर सुप्त लाट आहे. ते त्रस्त होतील. काल सरकार स्थापन झाल्यावर त्या तिघांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.
५ जानेवारीपर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, नसता हे मराठे तुफान ताकदीने आंदोलनात उभे राहून सरकारला त्रस्त करतील. २००४ च्या अध्यादेशामध्ये दुरुस्ती करायची,
सगेसोयरेची अंमलबजावणी करायची यासोबतच तिन्ही गॅझेट आणि लाखो मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस मागे घ्याव्यात, असेही जरांगे यांनी या वेळी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपोषणाची तारीख
आमच्या ज्या ८-९ मागण्या आम्ही पूर्वीच्या सरकारकडे मांडल्या होत्या, आताही तेच सरकार आहे. त्यांनी या मागण्या मार्गी लावाव्यात, नसता पुन्हा मराठा समाजाला त्यांना सामोरे जायचे आहे. सरकारने गुर्मी अन् मस्तीत राहू नये. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू. सरकारने समाजाला सांभाळायचे शिकावे. जनतेने तुम्हाला निवडून दिलेय, तुम्ही जनतेचे मन जिंकायचे काम करा, असे आवाहन जरांगे यांनी महायुती सरकारला केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज