टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीच्या तपासासाठी डी.बी.पथक तयार करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता
यामध्ये डी. बी. पथकाला १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या वापरत्या ३ मोटर सायकली शोध घेण्यात यश आले आहे.
मंगळवेढा शहरात भर दिवसा मोटर सायकली गायब झाल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांचे डी.बी. पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,
पोलीस अंमलदार महेश पोरे, वैभव घायाळ, सुरज देशमुख, कृष्णा जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे ३ मोटर सायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे.
दरम्यान आरोपी सिध्देश्वर मारुती कदम (रा. मुढवी) याच्याकडे चोरीच्या मोटर सायकली असल्याची माहिती मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता ३ मोटर सायकली मिळून आल्या.
यामध्ये फौजदार चावडी सोलापूर शहर हद्दीमधील एम. १३ ए.आर.५४१४ ही ३० हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ सी.एम. ९१०१ ४५ हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ बी.ए.९५५९ ३० हजार रुपये किंमतीची
मंगळवेढा शहरातील दोन असा एकूण १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरपदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,
डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी ही विशेष कामगिरी बजावली आहे.
दरम्यान यातील फिर्यादी संजय दत्तू हे वेल्डींग व्यवसायिक असून त्यांची मोटर सायकल २२ जून रोजी दुपारी ३ वाजता डोळ्यादेखत सदर चोरटयाने हातोहात पळविल्याची घटना घडली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज