टीम मंगळवेढा टाईम्स ।
अजित जगताप यांनी मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे त्या परिसराचा सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी निधी मागितलेला होता.
त्यांना त्याच्यामध्ये निधी देण्याच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेवटी आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या ज्या महिला होऊन गेल्या तसेच आत्तापर्यंत जे महापुरुष होऊन गेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला काम करावे लागणार असल्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तिन्ही युग पुरुषांच्या मूर्ती परिसर सुशोभीकरणासाठी जिल्हा अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन अर्थ खात्याच्या अंतर्गत जिल्हा नगरस्थान योजनेतून निधी मंजूर केला असल्याचे मतदार संघाचे अध्यक्ष अजित जगताप यांनी सांगितले.
दुसऱ्याचं पळवून नेणं माझ्या रक्तात नाही; मिलेट सेंटरबाबत अजितदादांचा खुलासा
सोलापूरच्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्राला (मिलेट सेंटर) कोणताही धक्का लागलेला नाही. कोणाला दिलेले खेचून न्यायचं, हे माझ्या स्वभावात आणि रक्तातही नाही. मिलेट सेंटर सोलापूरऐवजी बारामतीला नेलेले नाही.
मागील काळात तसे परिपत्रक निघाले असेल तर येत्या सोमवारी तो दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्याचा शासकीय निर्णय जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. तसेच, त्यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मिलेट सेंटरबाबत अधिवेशनात प्रश्न मांडला होता. हे केंद्र सोलापूरमध्ये व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
श्री अन्न उत्कृष्टता केंद्रावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलेले आहे. त्यावर आज सोलापूरमध्ये आलेल्या अजित पवार यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, मिलेट सेंटरसंदर्भात पाठीमागच्या काळामध्ये गैरसमज निर्माण करण्यात आला आहे. सोलापूरच्या मिलेट सेंटरला धक्का लागलेला नाही.
यासंदर्भात मी अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, असं काहीही झालं नाही. आमचं आम्हालाच ठेवलेले आहे. अशी मिलेट सेंटर दोन ते तीन करायची होती, त्यातील एक बारामतीला गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी मी, देवेंद्र फडणवीस आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी कृषी विभागाशी चर्चा केली. सोलापूरचे मिलेट सेंटर बारामतीला हलवलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
मी सोलापूरकरांना सांगतो की, मी ३२ ते ३३ वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. कोणाला दिलेला, असं खेचून आणायचं, हे माझ्या स्वभावात नाही आणि रक्तातही नाही. त्यामुळे जे ज्या जिल्ह्यासाठी मंजूर झालं आहे, ते त्यांनाच मिळेल, असा शब्दही अजित पवार यांनी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज