टीम मंगळवेढा टाईम्स।
तेरणा ज्याच्या ताब्यात राजकीय सत्ता त्याच्या खिशात असं उस्मानाबादेतलं समीकरणच आहे. त्यामुळे DRAT कोर्टाने दिलेला एक निर्णय मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी राजकीय गॅरेंटी देणाराच ठरू शकतो.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे कर्ज वसुली न्यायाधिकरण कोर्टाने आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा बँकेनी राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य असल्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे.
भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती. मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने याविरोधात DRAT कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली होती.
तब्बल एक वर्षाच्या न्यायलयीन लढाईनंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज