टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात बाल सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात शून्य ते १८ वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुले-मुली यांची आरोग्य तपासणी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मीक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग,
आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग, पंचायत राज विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात शून्य ते १८ वर्ष वयोगटातील एकूण लाभार्थी ९ लाख ३३ हजार ५३० एवढे आहेत. त्यापैकी २५ मार्चअखेर ५ लाख २४ हजार ६४७ मुलांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ४६ हजार ४१४ आजारी बालके आढळली. यापैकी ३१ हजार १३३ बालकांना औषध उपचार करण्यात आले. यातील २५२ बालकांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी ४६४ प्राथमिक तपासणी पथके तयार केली आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही बालक तपासणीपासून वंचित राहू नये अशी खबरदारी आरोग्य विभागामार्फत घेतली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज