टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र सरकारने अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या गाईडलाइंसमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. The maharashtra government extended the lockdown till August 31, issuing new regulations
Govt of Maharashtra issues directions to extend the lockdown, with amendments, to operationalize MISSION BEGIN AGAIN for easing of restrictions and phase-wise opening, till 31 August, 2020. pic.twitter.com/Dg13hUTPBe
— ANI (@ANI) July 29, 2020
महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच.
दरम्यान, देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.
देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईननुसार 15 ऑगस्टच्या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी काही मागर्दर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. कमीत कमी संख्येत आणि मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करत, ध्वजारोहन समारंभ घेण्यात येईल, असेही केंद्राने म्हटले आहे.
देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालसह अनेकांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातही लॉकडाऊन31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.
पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल
उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले
– शहरांमधले मॉल सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत उघडायला परनवानगी
– 5 ऑगस्टपासून मॉल उघडणार. पण थिएटर बंदच राहतील.
– 5 ऑगस्टपासून जिम आणि इतर खेळांची मैदानं उघडणार. पण स्वीमिंग पूल बंदच राहतील.
– जिल्हाबंदी कायम. अत्यावश्यक असेल तरच प्रवासाला परवानगी
– मास्क बंधनकारक.
घातला नाही तर दंड आकारणार
– प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन असेल.
-फूड कोर्ट, रेस्टॉरंट बंदच राहणार
राज्यातही अनलॉक 3 चे नियम बदलू शकतात
बुधवारी ( 29 जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 31 जुलैनंतर लॉकडाऊन किती दिवस करावा, याबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही गोष्टींना परवानगी देण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज