टीम मंगळवेढा टाईम्स।
इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ललाहू यांच्या ईद मिलादुन्नबी जयंतीनिमित्त मदिना मस्जिद बोराळे नाका, मंगळवेढा येथे स्वीट मदिना सोशल फाउंडेशन यांच्या वतीने
इस्लाम धर्मामध्ये असणाऱ्या पवित्र अशा कुराण व हदीस या ग्रंथाचे मोफत वाटप पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण व शहरी भागामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शिकवण, नमाज, शरीयत व हदीस याचे सर्वांना त्याची माहिती मिळावी व त्याचे आचरण करावे यासाठी स्वीट मदिना फाउंडेशनच्या वतीने
सर्वांना माहीत व्हावी ह्या हेतूने हिंदी अक्षरांमध्ये असलेले चहल रब्बना, अनवारे शरीयत, व 40 दरुद विविध प्रकारचे पवित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी जुलूस मधील असणाऱ्या मुस्लिम बांधवांना मदिना यंग सर्कल ग्रुपच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.
तसेच धर्मामध्ये जे मदरसा अथवा घरामधे कुरान पठण चे शिक्षण घेतले आहे अशा मुला-मुलींना, थोर व्यक्तींना पवित्र कुरान पाक, हदिस व मुस्लिम शरीयत ग्रंथ सर्वसामान्यांना समजावे यासाठी एक वेगळ्या पद्धतीने मोफत देऊन फाउंडेशन ने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
तसेच निराधार तसेच गरजूंना विविध प्रकारच्या मूलभूत अडचणी संदर्भात यापुढेही सहकार्य करण्याचे आव्हान फाउंडेशनचे अध्यक्ष दावल इनामदार यांनी सांगितले.
यावेळी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील युवकांनी सदर जुलूस कार्यक्रम प्रसंगी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील आधारीत व आचरणात आणलेले हदिस मधील माहिती देऊन मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी इतर खर्चांना फाटा देत साध्या पद्धतीने मोफत अशा पवित्र कुराण व हदीस याचे वाटप करण्यात आले.
यावेळी दामाजी एक्सप्रेस समूहाचे प्रमुख दिगंबर भगरे, मंगळवेढा टाईमचे संपादक समाधान फुगारे, दावल इनामदार ,बाबुल मुजावर, साहिल इनामदार, वसीम इनामदार, साजिद इनामदार, मेहफुज इनामदार तसेच स्वीट मदिना यंग सर्कल ग्रुपचे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज