टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा चेअरमन तथा जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
तर मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील बबनराव आवताडे यांनी दिली आहे.
मतदार संघातील समाजकारण व राजकारण या सेवाक्षेत्रात आपली कार्य भूमिका निभावत असताना जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वसमावेशक सहकाराचे मोठे जाळे निर्माण करून कार्यकर्ता जोडण्याचे प्रमुख काम केले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर बबनराव आवताडे यांच्या विचारांचा पगडा असणारे लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सत्तेवर आहेत. त्याचबरोबर धोरणात्मक युवक संघटन आणि दांडगा जनसंपर्क यांच्या जोरावर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांनी तालुकावर जनसंपर्काची नाळ व्यापक केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कार्यकारी सोसायटी संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा तालुक्यातील विविध सहकारी संस्थांवर ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी एकहाती आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
गाव खेड्यातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी अशा घटकांना सहकार विश्वाच्या माध्यमातून विकासाच्या आणि परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवक नेते सागर बबनराव आवताडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे,
कृषी उद्योग संघाचे चेअरमन शैलेश बबनराव आवताडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील बबनराव आवताडे यांनी नेहमीच प्रयत्नशील राहून या संस्थांचे अस्तित्व विस्तारित केले आहे.
सदर मेळाव्यामध्ये नियोजित पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा राजकीय घडामोडींचा अंदाज आणि कार्यकर्त्यांचे व गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे आपली भूमिका जाहीरपणे मांडणार आहेत.
सार्वजनिक राजकारणातील एक विचारशील आणि मातब्बर नेतृत्व म्हणून बबनराव आवताडे यांच्या विचारांचा नेहमीच आदर केला जात असल्यामुळे त्यांची आजच्या मेळाव्यातील राजकीय भूमिका निर्णायक आणि महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा राजकीय जाणकारांनी मांडली आहे.
तरी नियोजित संवाद मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शैलेश बबनराव आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज